
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
'मुंबईतील वर्षा येथील शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी दहन केले
कृषीमंत्र्यांकडून अवकाळी पावसाची दखल
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसान भरपाईची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना पंचनामा करुन नुकसान भरपाईबद्दलचे आदेश दिले आहेत.
मुंबईतही बरसणार, BMC ने दिली माहिती
मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आगामी उन्हाळ्यात गरम हवामानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी उच्च-स्तरीय बैठक : पीएमओ
पुण्यात पावसाला सुरुवात
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पावसाच्या तुरळक सरी
नवी पेठ, डेक्कन, गरवारे महाविद्यालय भागात पावसाच्या हलक्या सरी
२ दिवसांपूर्वी हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अंदाज दिला होता
पुढील २,३ दिवस पुण्यासह काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे
वारजे, कोथरूड मध्ये तुरळक सरी
सदाशिव पेठ, टिळक रोड परिसरात पाऊस
धानोरी, भैरवनगर मध्ये पावसाला सुरूवात
टिंगरे नगर, विश्रांतवाडी मध्ये देखील पाऊस
दांडेकर पुलाजवळ पावसाचा जोर वाढला

pune rain
विदर्भासह, अहमदनगर, नाशिकमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.
पिंपळनेर, जेबापूर, बल्हाने, देशशिरवाडे, कुडाशी, वार्सा, शेंदवड, मांजरी परिसरासह पश्चिम पट्ट्यात जोरदार वादळ, वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बरसल्या जोरदार वादळ, वाऱ्यामुळे गहू, हरभरा, मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून कांदा, भाजीपाला या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. होळी सणावर ही पावसाचे विर्जन आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
धुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले.
पेपरफुटी प्रकरणात आरोपींना १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महागाईची होळी
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महागाईची होळी
घरगुती गॅस दरवाढीचा विरोध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ने केली होळी
जीवनावश्यक वस्तू, जी एस टी, औषधे, शासकीय यंत्रणेचा वापर, पेट्रोल, डिझेल, सी एन जी, खाद्य तेल, वीज या सगळ्या गोष्टींचे दर सरकार ने वाढवला असून या गोष्टींच्या विरोधात ही होळी साजरी करण्यात आली
घरगुती गॅसची रावणाची प्रतिकृती दहन करत राष्ट्रवादीने केला सरकारचा निषेध
या होळीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती
महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई
पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने नागपूर आणि मुंबईतील १५ ठिकाणी शोध आणि सर्वेक्षण केले आहे. यादरम्यान ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे, असे ईडीने सांगितले.
उद्धव ठाकरे गटाचे नेते योगेश भोईर यांच्याविरोधात ACB ची कारवाई
उद्धव ठाकरे गटाचे नेते योगेश भोईर यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील शोध मोहिमेसाठी एसीबीचे पथक मुंबईतील कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
CBI ने RJD अध्यक्ष लालू यादव यांना समन्स पाठवले
CBI ने RJD अध्यक्ष लालू यादव यांना समन्स पाठवले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात हे समन्स पाठवण्यात आले आहेत.
मनिष सिसोदियांना धक्का! न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्यात आरोपी असलेल्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज राउज एवेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज त्यांना २० मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढा - संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे. तर याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.
माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआय'ची छापेमारी
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याचा कथित घोटाळा प्रकरणात त्यांच्या माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटूंबियांची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट, मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरात गुन्हा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या मुंबईतील तरुणाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांचा अपघात
अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' (Projekt K) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले.
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्याचे हेल्थ अपडेट शेअर केले आणि सांगितले की ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे.
ठाकरेंच्या सभेला मुंबई, ठाण्याहून लोक आणली- रामदास कदम
तुमच्याकडे धनुष्यबाण येऊ शकलं नाही हे दुर्दैव - रामदास कदम
धनुष्यबाण सगळ्यांच्या हाती येत नाही - कदम
ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी मी केली आहे - कदम
खोके तुम्ही घेतले आम्ही नाही - कदम
खेडमध्ये काल शिमगा झालं - कदम
तुमच्या वडिलांच्या विचारांशी तुम्ही बेईमानी केली - कदम
उद्धव ठाकरेंचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत- कदम
खेडला येऊन उद्धव ठाकरेंनी चूक केली - कदम
शिवसेना खासगी मालकी आमदार खासदारांना खासगी मालकी समजते - कदम
संजय कदमला मी मोठं केलं - कदम
चिपळूणचा लांडगा म्हणत भास्कर जाधव यांच्यावर रामदास कदम यांनी टीका केली
मुख्यमंत्र्यांची जीभ हसडण्याची भाषा शोभत नाही - कदम
कसब्याच्या विजयावर शरद पवार यांना शंका होती?
कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला असला तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल याची खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खात्री नव्हती. खुद्द शरद पवार यांनीच याची माहिती दिली. पवारांना कसब्यात यश येणार नाही. असं का वाटलं? याची माहितीही शरद पवार यांनी दिली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात एकापाठोपाठ दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊ आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिल्लोडच्या अंधारी गावात ही घटना घडली आहे. आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला असताना, पिकांना योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
कसबाचे आमदार रवींद्र धंगेकरींनी घेतली शरद पवार यांची भेट
कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट
धंगेकर यांनी शरद पवार यांच्या पुण्यातील निवस्थानी मोदीबाग येथे भेट
धंगेकर आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर