दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE Update
LIVE Update

LIVE Update : बांगलादेशात मोठा स्फोट, मृतांची संख्या १५ वर

ढाका येथील सहा मजली इमारतीत झालेल्या स्फोटामुळे मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

जुहू चौपाटीवर होळी खेळायला गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

धूलिवंदनाच्या निमित्ताने जुहू चौपाटीवर तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंधेरी पश्चिमेकडील प्रसिद्ध जुहू समुद्र चौपाटीवर मंगळवारी ही घटना घडली.

आमदार रवींद्र धंगेकर उद्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट

कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर उद्या महाविकास आघाडी मधील नेत्यांची भेट घेणार आहेत. धंगेकर उद्या सकाळी ८ वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

मुंबई : विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुंबईत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3-4 तासांत पाऊस पडू शकतो. IMD ही माहिती दिली आहे.

गुवाहाटीमध्ये पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.

धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी इंद्रायणीकाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

धूलिवंदन खेळून हातपाय धुण्यासाठी इंद्रायणीकाठी गेलेल्या एकवीस वर्षीय युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला आहे. जयदीप पुरुषोत्तम पाटील असे या मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

बांगलादेशात मोठा स्फोट, ७ जण ठार

बांगलादेशातील ढाका येथील इमारतीत झालेल्या स्फोटात किमान 7 जण ठार झाले आहेत. तर 70 हून अधिक लोक जखमी झाले आगे. स्थानिक मीडियाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह ठाण्यात होळी साजरी केली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह ठाण्यात होळी साजरी केली

मुंबईत ब्लाइंड स्कूलच्या सात मुलांना अन्नातून विषबाधा

मुंबई : तारदेव येथील व्हिक्टोरिया मेमोरियल ब्लाइंड स्कूलच्या सात मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याती माहिती बीएमसीने दिली आहे.

नेफियू रिओ पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

नागालँडमध्ये एनडीपीपी नेते नेफियू रिओ यांनी पाचव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यास ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

कोनराड संगमा दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

कोनराड संगमा दुसऱ्यांदा मेघालयच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान. त्यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते यांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

नाशिक जिल्ह्यात 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान

नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार दोन दिवसांच्या अवकाळीने तब्बल 2600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख कोनराड संगमा यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ 

नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख कोनराड संगमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सलग दुसऱ्यांदा मेघालयचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. NPP नेतृत्वाखालील आघाडीने मेघालयमध्ये भाजपच्या दोन आमदारांसह 45 आमदारांसह सरकार स्थापन केले. मोदींचे सकाळी गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले, तेथे आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने शिलाँगला रवाना झाले, जिथे त्यांचे स्वागत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले, जे सोमवारी तेथे पोहोचले होते. आसामचे मुख्यमंत्री आणि एनईडीएचे निमंत्रक हिमंता बिस्वा सरमा हेही उपस्थित होते.

सकाळपासून अनेक ठिकाणी रंगांची उधळण; लहानांपासून मोठ्या लोकांपर्यंत रंग खेळून धुलीवंदनचा उत्सव

सकाळपासून अनेक ठिकाणी रंगांची उधळण होताना दिसून येत आहे. लहानांपासून मोठ्या लोकांपर्यंत रंग खेळून धुलीवंदनचा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. चिमुकले रंग खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. राज्यभर आज धुलीवंदनाचा उत्साह दिसून येत आहे. पुणे शहरात देखील ठिकठिकाणी चिमुकल्यांचा धुलीवंदनाचा जल्लोष सुरू आहे. पुणे शहरात भोई प्रतिष्ठान तर्फे देखील अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भोई प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो. या उपक्रमामध्ये यामध्ये अनाथ, एचआयव्ही बाधित, अंध ,अपंग मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारे मुले ,देवदासी भगिनींची मुले ,रस्त्यावर डोंबाऱ्यांचा खेळ करणारे मुले ,मतिमंद मुले ,ऊस तोडणी कामगारांची मुले, अश्या वंचित घटकातील मुले सहभागी होत असतात.

बारावी गणित पेपरफूटी प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे

बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यामुळे शिक्षण यंत्रणेवर आक्षेप घेण्यात येत होते. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. बारावी गणितच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये आता विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आलं आहे. रविवारी पोलिसांनी पकडलेल्या पकडलेल्या दोन्ही आरोपी शिक्षकांना १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाचे नव निर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर नऊ मार्चला घेणार शपथ

कसबा विधानसभा मतदारसंघाचे नव निर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर घेणार नऊ मार्चला आमदारकीची शपथ घेणार आहेत. रवींद्र धंगेकर यांच्यासह अश्विनी जगताप यांचा देखील ९ मार्चला विधान सभेत सदस्यत्वाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाला मारण्याची धमकी

वसंत मोरेंच्या मुलाला खंडणीची मागणी करत मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रुपेश मोरे (वय - २१) याला ३० लाखाची खंडणी मागणारा मेसेज करण्यात आला आहे. ३० लाख दे नाहीतर मुस्लीम मुलीसोबतच्या लग्नाचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करण्याची धमकी त्याला देण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com