

Maha Livestock Insurance Scheme
esakal
नागपूर: जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकाचे आर्थिक गणित कोलमडू नये, यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुधन विमा योजना लागू केली आहे. या विमा हप्त्यात तब्बल ८५ टक्के अनुदान केंद्र व राज्य शासन देणार आहे. दहा जनावरांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे. हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, वीज पडणे, सर्पदंश, दूषित पाणी अथवा अपघातामुळे जनावरे दगावतात.