नवरात्र निमित्ताने सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या दुर्गामाता दौडीची आज मोठ्या उत्साहात सांगता झाली. नऊ दिवस शहरामध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहामध्ये दुर्गामाता दौड सुरू होती. शहरातल्या दुर्गामाता मंदीरापासून या दौडीला सुरुवात झाली,त्यानंतर शहरातील विविध मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दुर्गामाता दौडीचा समारोप झाला. या दौडीत पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करून हजारो धारकऱ्यांनी सहभाग घेतला होता. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाने नऊ दिवस दौडी सुरू असणाऱ्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली.