Latest Marathi News Live Update
esakal
‘राज्यातील शेतकरी संकटात असताना मी काय केले, तुम्ही काय केले हे बघण्याची वेळ नाही. शेतकऱ्याला भरीव मदत करा, पंजाब सरकारच्या धर्तीवर हेक्टरी ५० हजारांची मदत मिळाली पाहिजे. होय, मी आरशात पाहतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे पाहा’, अशा शब्दांत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले.