Latest Marathi News Live Update
esakal
महाराष्ट्र बातम्या
Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 16-october 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकारला फटकार
सिडको भूखंड घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी झालेल्या सुनावणीत भूखंड घोटाळ्यातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई न केल्याबद्दल राज्य सरकारला फटकारले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार)आ. रोहित पवार यांनी दिली. याप्रकरणी नगर विकास विभाग, वन विभाग, मुख्य सचिव आणि सिडको यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
