Latest Marathi News Live Update
esakal
पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती देण्यासाठी महसूल व वन विभागाने पुणे महानगरपालिकेला ११,०१५ चौरस मीटर (१ हेक्टर १०.१५ आर) इतकी शासकीय जमीन कब्जेहक्काने देण्यास मंजुरी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला चालना मिळणार असून, मुळा-मुठा नदीच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.