Latest Marathi News Live Update
esakal
राज्य सरकारकडून जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी जूनपर्यंत होणाऱ्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार काय, असा करडा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला आहे. सरकारने पुढच्या जूनचा गूळ शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता हालअपेष्टा तशाच राहणार, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकऱ्यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे सरकारला केली आहे.