Latest Marathi News Live Update
esakal
महाराष्ट्र बातम्या
Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 9 January 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
आम्ही घरं देणारे आहोत, घरं घेणारे नाही- देवेंद्र फडणवीस
वसई विरार मध्ये एकही गरिबांचे घर तोडून देणार नाही. एकीकडे अनधिकृत बांधकाम नंतर लोकांना धमकावून आता पर्यंत याठिकाणी काही लोकांनी राज्य केले आहे. आम्ही घर देणारे आहोत घर घेणारे नाहीत.आता पर्यंत या यहिकांनी भ्रष्टाचार, गुंडागर्दी, लोकांना धमकावले आहे यापुढे हे खपून घेणार नाही. यापूर्वी वसई विरारची ओळख केळी, दूध होती. पण कालांतराने या ठिकाणी दहशतीचे राजकारण सुरू झाले. याठिकाणच्या लोकांनी ह्या महापालिकेला एटीएम म्हणून वापर केला. ह्याठिकानी टँकर माफिया निर्माण झाले. आम्हाला वसाई विरारची ओळख विकासाची करायची आहे, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नालासोपारा येथील भाजप सेने युतीच्या जाहीर सभेत केले.
