‘स्वप्नांचे कौतुक’ कॉफी टेबल बूक या लघुपटाचे मंत्रालयात प्रकाशन

subhash desai
subhash desaisakal media
Updated on

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'स्वप्नांचे कौतुक' (Swapnanche kautuk book) या कॉफी टेबल बूक आणि लघुपटाचे प्रकाशन उद्योगमंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांच्या हस्ते आज मंत्रालयात (ministry) करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अन्सु सिन्हा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, सहसचिव संजय इंगळे, अर्थसल्लागार विद्यासागर हिरमुखे, राजकुमार डांगर, मेधा वाके आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

subhash desai
मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 334 नव्या रुग्णांची भर; दोन जणांचा मृत्यू

राज्यातील खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांमधून यशस्वीपणे रोजगार निर्माण करणाऱ्या ग्रामीण उद्योजकांच्या यशोगाथा या कॉफीटेबल बूकमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील पारंपारिक उद्योग तसेच शेतीपुरक व्यवसाय बरोबर हस्तकला, निसर्ग पुरक व्यवसाय आदी ग्रामोद्योगांनी यशस्वीरित्या उभारलेले उद्योग हे नव तरुण उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा आशावाद देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामीण भागातील अधिकाधिक लोकांना रोजगार मिळावा, तसेच त्यांचे स्थलांतर थांबावे आणि ग्रामीण भागातच कामय स्वरुपी उद्योग उभा रहावा हे मंडळाचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पुणे हातकागद संस्थेने तयार केलेले फोल्डर्स, डायरी व कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तूंचे देसाई यांनी अनावरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com