

Missing Person Complaints
esakal
ओझर (जि. नाशिक) : घरातून कुणालाही न सांगता व्यक्ती निघून गेल्यास आता केवळ बेपत्ता व्यक्तीची नोंद करून थांबता येणार नाही. महाराष्ट्राच्या गृह विभागाने सुधारित कार्यपद्धतीचे निर्देश जारी केले असून, प्रौढ महिला अथवा पुरुष बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच प्राथमिक माहिती नोंदवून शोधकार्य सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.