
IMD: ऐन मे महिन्याच्या अखेरीला मॉन्सूनपूर्व पावसाने राज्याला वेठीस धरल्यानंतर आता मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मॉन्सून रखडला आहे. त्यामुळे दुपारनंतर काही ठिकाणी काळ्या ढगांची गर्दी होऊन काही सरी कोसळल्या तरी तो मॉन्सून नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे. १५ जूनपर्यंत राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे. या दरम्यान राज्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि मॉन्सूनचा सर्वदूर पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.