| मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer attempted self-immolation in front of the Ministry

मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; गंभीर जखमी

मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी आत्मदहनापासून परावृत्त केले असून त्याच्याकडून ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले आहे.(Maharashtra monsoon Session A farmer attempted self-immolation in front of the Ministry)

साताऱ्यातील कांदळगावचे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख वय ४५असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष हे शेती विषयक प्रश्नाच्या मागणी करण्यासाठी आले होते. मात्र, त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. आणिा आत्मदहनाचा प्रयत्न केला.

आग विझवत देशमुख यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. शेतीच्या वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यतिथ झालेल्या देशमुख यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

विधान भवन परिसरातील आत्मदहन प्रकरणावर सभागृहात चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना थेट धारेवर धरलं. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही या प्रकरणाची माहिती घेतली असून संबंधित शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच त्याला सर्व मदत केली, जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. १८ लाख हेक्टर नुकसान झालंय. त्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे होते. मजुराला एकरकमी मदत करण्याची मागणी केली होती, पण तीही विचारात घेतली नाही. असा आरोप अजित पवारांनी केला आहे.

Web Title: Maharashtra Monsoon Session A Farmer Attempted Self Immolation In Front Of The Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..