Love Jihad Law : लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरच; राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
Maharashtra Government : महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा तयार करण्यासाठी गृह विभागाने हालचाली सुरू केल्या असून पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा तयार करण्याच्या हालचाली गृह विभागाने सुरू केल्या आहेत. यासाठी पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सात जणांच्या समितीची स्थापना केली असून त्याचा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला.