

Devendra Fadnavis: The Leader Redefining Maharashtra’s Urban Politics
esakal
भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आणि त्यातून केवळ पक्षाचंच नव्हे, तर नेतृत्वाचंही सामर्थ्य ठळकपणे पुढे आलं. महाराष्ट्रात आतापर्यंत जे कुणालाच साध्य झालं नव्हतं, ते फडणवीसांनी करून दाखवलं. त्यामुळे त्यांच्या धुरंधर, सर्वसमावेशक नेतृत्वाची चर्चा आता राज्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. टीका होत राहते, पण कौशल्य झाकता येत नाही. भाजपमधील अंतर्गत राजकारण असो वा विरोधकांची कोंडी, प्रत्येक पातळीवर फडणवीसांनी चाणक्यनीतीने बाजी मारली. म्हणूनच उद्याच्या भारताच्या नेतृत्वात त्यांचं नाव अग्रभागी असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.