कृषिपंपाच्या बिलासाठी 15 दिवसांची मुदतवाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

मुंबई - राज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी आज शासनाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली. आता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही. 

मुंबई - राज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी आज शासनाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली. आता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही. 

थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी 30 ऑक्‍टोबरलाच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना सात नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल. तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडीत केली जाणार नाही. 30 हजार रुपयांपर्यंत मूळ रकमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल मूळ रकमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहेत. ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरित वीजबिल वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या. अनधिकृत वीजजोडण्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra news 15-day extension for agricultural bills