"पोस्ट ऑफिस आपल्या दारी' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

मुंबई - टपाल खात्याच्या विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी आता नजीकच्या टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण टपाल कार्यालय आपल्या दारी येणार आहे. बचत खात्याच्या योजनांसह अनेक योजनांचा मुंबईतील सोसायट्यांमध्ये प्रचार, प्रसार करण्यासाठी या खात्याने पुढाकार घेतला आहे. त्याची सुरवात या खात्याच्या पूर्व विभागापासून झाली आहे. 

गृहनिर्माण संस्था, रहिवासी संकुले, कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते सरकारी आस्थापनांपर्यंत सर्व ठिकाणी पोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पूर्व विभागाचे वरिष्ठ अधीक्षक ईश्वर पाटील यांनी सांगितले. टपाल विभागातील ठेवींवर जनसामान्यांचा विश्‍वास आहे. याच विश्‍वासाच्या जोरावर विविध वयोगटांतील खातेधारकांपर्यंत पोचण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असल्याचे ते म्हणाले. 

मुदत ठेव योजना, मासिक उत्पन्न योजना, वरिष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय बचत पत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकास पत्र, सार्वजनिक भविष्य निधी यांसारख्या योजनांतर्गत एक लाख बचत खाती उघडण्याचाही आमचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी दादर ते फोर्ट मुंबई असा सगळा परिसर पिंजून काढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. "पोस्ट ऑफिस आपल्या दारी' या योजनेच्या माध्यमातून आमचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पथक घरोघरी जाणार आहेत. काही सोसायट्या आणि पोलिस ठाण्यांपासून ही सुरवात झाली आहे. पोस्ट खात्यात अगदी 50 रुपयांच्या किमान ठेवीपासून बचत खाते उघडणे शक्‍य आहे. खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आणि दोन फोटो एवढ्याच कागदपत्रांची गरज असते. टपाल खात्याच्या एटीएम सुविधेमुळेही खातेधारकांना आता कोणत्याही एटीएममधून व्यवहार करणे शक्‍य झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

Web Title: maharashtra news post office