
‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे सोमवारी मिस महाराष्ट्र स्पर्धेची घोषणा झाली. जुहू येथील नोवाटेल हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात अनेक तारे-तारका उपस्थित होत्या. या सोहळ्यातील क्षणचित्रे.
‘सकाळ’ मिस महाराष्ट्र स्पर्धा- गुणवत्तेला प्रकाशकोंदण
अनेकदा ओळखी काढून कोणत्या तरी मोठ्या संस्थेतून शिकून मुले-मुली चित्रपट क्षेत्रात येतात; पण या स्पर्धेतून आम्ही गावागावांतील फाईन टॅलेंट शोधणार आहोत. सौंदर्यच नव्हे; तर त्यांची बुद्धिमत्ताही त्यातून समोर येईल. या गुणवान मुलींना संधी द्यायला मला नक्कीच आवडेल.
- महेश मांजरेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक
गावांमध्ये लपलेले अभिनयाचे टॅलेंट आम्ही शोधणार आहोत. ते केवळ चेहऱ्याचे सौंदर्य नसेल; तर बुद्धिमत्तेसह सर्वांगीण सौंदर्य असेल. ते शोधून त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- ललित प्रभू, स्पर्धेचे फॅशन कोरिओग्राफर व ग्रुमर
अभिनेते होऊ इच्छिणारी मुले मुंबई-पुण्यात येऊन कशीही राहू शकतात. अगदी ‘आमदार निवास’च्या गॅलरीत झोपून या इंडस्ट्रीत मोठी झालेली अनेक उदाहरणे आहेत; पण मुलींना पेईंग गेस्ट म्हणून राहणेही आर्थिकदृष्ट्या अवघड असते. आता मात्र खेडोपाड्यांतील मुली या स्पर्धेत सहभागी होतील. त्यांना त्यातून चांगली संधी मिळेल. मी लवकरच ‘अहिल्या’ हा स्त्रीप्रधान चित्रपट करणार आहे. त्यातील अभिनेत्रीची निवड या स्पर्धेतून होऊ शकते.
- राजू पार्सेकर, दिग्दर्शक
हा सर्वोत्तम उपक्रम आहे. त्यातून गुणवत्तेला संधी मिळेल. या स्पर्धेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
- नानिक जयसिंघानी, निर्माते
ही केवळ सौंदर्य स्पर्धा नाही. आम्ही त्यातून ‘ब्युटी विथ ब्रेन’ शोधणार आहोत. आमचे काम सोनार, जवाहिऱ्यांसारखे आहे. हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम आम्ही करणार आहोत.
- स्वाती वाधवानी, सुपर मॉडेल
‘सकाळ’ची स्पर्धा म्हणजे की तिचा दर्जा उत्तमच असणार यात शंका नाही. ‘सकाळ’चा नाट्यमहोत्सवही दर्जेदार व त्यामुळेच हाऊसफुल्ल असतो. ही स्पर्धाही दर्जेदारच असेल. त्यातून इंडस्ट्रीला नव्या गुणवान नायिका मिळाल्या, तर आमचेही काम सोपे होईल.
- उमेश कामत, अभिनेता
या स्पर्धेला सामाजिक टच आहे. मी आदिवासी विभागात काम केले आहे. तेथील मुलींमध्ये प्रचंड टॅलेंट असते; पण त्यांची भाषा वेगळी असते. अशीच अडचण ग्रामीण भागांतील मुलींची असू शकते. पुणे-मुंबईसारखी भाषा बोलू शकत नसल्याने कदाचित त्या पुढे येत नसतील; पण या स्पर्धेतून त्यांना संधी मिळेल. या स्पर्धेद्वारे कोळशात दडलेल्या हिऱ्याला पैलू पाडण्यात येणार आहेत.
- समृद्धी पोरे, दिग्दर्शिका
राजकरणाशी काडीचाही संबंध नसलेले उपक्रम ‘सकाळ’मार्फत चालवले जातात. सध्याचे युग मुलींचे आहे. भविष्यात अनेक नायिकाप्रधान चित्रपट येतील. या स्पर्धेतून अनेक तडफदार तरुणी इंडस्ट्रीला मिळतील.
- मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री-निर्माती
आपल्याला चांगल्या अभिनेत्रींची गरज आहे. या स्पर्धेतून किमान १० ते १५ नायिका मिळतील. ही स्पर्धा संपल्यानंतर १०-१५ दिवसांत माझ्या नव्या सिनेमाचे शूटिंग सुरू होईल. अभिनेत्याची निवड झाली आहे. त्यातील मुख्य अभिनेत्रीची निवड मी स्पर्धेतील विजेत्यांमधून करणार आहे.
- मिलिंद कवडे, दिग्दर्शक
माझ्या सिनेमांमध्ये मी नव्या चेहऱ्यांनाच संधी देतो. प्रस्थापितांना संधी देणे मी टाळतोच. मराठी चित्रपट उद्योगाला चांगल्या नव्या चेहऱ्यांची गरज आहे. या स्पर्धेतून चांगल्या अभिनेत्री मिळतील, याची मला खात्री आहे.
- विजय पाटकर, अभिनेता-दिग्दर्शक
मी पहिला चित्रपट केला, तेव्हा माझ्याबरोबरच पाच अभिनेत्रींनी करिअर सुरू केले. त्यांनी पुढे नाव कमावले. या स्पर्धेतूनही चांगले टॅलेंट मिळतील. रमेश देव प्रॉडक्शनने मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यास त्यात या स्पर्धेतील तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करेन.
- अजिंक्य देव, अभिनेता-निर्माता
ग्रामीण भागांतील तरुणींना अशा व्यासपीठाची गरज होती. प्रत्येकीला मुंबईत येणे शक्य नसते. आता त्यांना त्यांच्या घराजवळ संधी मिळणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुलींमध्ये टॅलेंट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने हे टॅलेंट लोकांसमोर येईल. सकाळ माध्यम समूहाचा हा पहिला प्रयत्न आहे. या रोपट्याचा भविष्यात डेरेदार वृक्ष होईल.
- निरंजन देवणे, मार्केटिंग हेड, पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्स
पुरस्कर्त्यांपैकी विशेष नायक (स्टार कॉस्मेटिक्सचे व्यवस्थापकीय संचालक) व सौ. रूपश्री विशेष नायक, सिद्धार्थ छेडा (टॉपलाईन ॲक्टिव्ह सॉल्टचे संचालक) व सौ. खुशाली सिद्धार्थ छेडा, तृप्ती गुप्ता (आयपिंकच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक), सीमा भदोरिया (मुख्य कार्यकारी अधिकारी) व कांचन शहा (मार्केटिंग हेड) (रीचफील) व स्वाधारच्या संजीवनी हिंगणे (मानद सचिव) तसेच नेहा देशपांडे (मिसेस इंडिया वर्ल्डवाईड २०१७) आदी मान्यवर सोमवारी हजर होते.
स्पर्धकांसाठी नोंदणीचा कालावधी - १६ ते २६ जानेवारी
ऑडिशनचे वेळापत्रक
मुंबई, ठाणे - १ फेब्रुवारी
सोलापूर - २ फेब्रुवारी
औरंगाबाद - ३ फेब्रुवारी
नाशिक - ५ फेब्रुवारी
नागपूर - ६ फेब्रुवारी
कोल्हापूर - ७ फेब्रुवारी
जळगाव - ८ फेब्रुवारी
पुणे - ९ फेब्रुवारी
ग्रूमिंग सेशन (पुणे) - १२ ते १६ फेब्रुवारी
अंतिम फेरी (पुणे) - १७ फेब्रुवारी
स्पर्धेची तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी तसेच प्रवेश अर्ज व नोंदणीसाठी इच्छुकांनी पुढील संकेतस्थळांना भेट द्यावी.
www.sakalmissmaharashtra.com
Facebook Sakal Miss Maharashtra
Instagram - Sakal Miss Maharashtra
Twitter - Sakal Miss Maharashtra
स्पर्धेचे पुरस्कर्ते
पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्स (टायटल स्पॉन्सर्स) स्टार कॉस्मॅटिक्स (मेकअप पार्टनर)
टॉपलाईन ॲक्टिव्ह सॉल्ट (फूड पार्टनर) आयपिंक द कलर ऑफ हेल्थ (न्यूट्रिशन एक्सपर्ट)
नावोटेल हॉटेल (व्हेन्यू पार्टनर) अप ऑन द स्टेज (इव्हेंट पार्टनर) रीचफील (हेअर पार्टनर) स्वाधार (एनजीओ पार्टनर)