Maharashtra Political Crises : सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटालाचं प्रश्न Who Are You?

Supreme Court
Supreme Court Sakal

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच सध्या सुप्रीम कोर्टात असून, या वादावर अद्याप कोणताही अंतिम निकाल सुनावण्यात आलेला नाही. आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात पाच न्यायाधिशांच्या खंडपिठासमोर सुनावणी पार पडली. मात्र, यावर अवघ्य दहा मिनिटांत निकाल देत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधिशांनी खरी शिवसेना असल्याचे सांगणाऱ्या शिंदे गटालाच Who Are You असा प्रश्न केला आहे. यावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सरन्यायाधिशांच्या या प्रश्नावर आता शिंदे गटाला उत्तर द्यावेच लागणार असून, त्यानंतर सर्वच प्रश्न निकाली लागतील असे विधान केले आहे. ते जालन्यात बोलत होते. याबाबत टीव्ही 9 ने वृत्त प्रकाशित केलं आहे.

यावेळी दानवे यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, चिन्ह गोठवण्याची मागणी म्हणजे शिंदे गटाने आगामी निवडणुकांचा धसका घेतल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीकडे चिन्ह गोठवण्याच्या शिंदे गटाच्या मागणीवर चंद्रकांत खैरे यांनीदेखील तिखट प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारखं आहे. चिन्ह गोठवलं तर शिवसैनिक अधिक आक्रमक होतील असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.

शिंदे गट काय उत्तर देणार?

दरम्यान, बंडखोरीनंतर खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून वेळोवेळी केला जात आहे. मात्र, आज सरन्यायाधिशांनीच आजच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटालाच तुम्ही कोण आहात असा प्रश्न विचारला आहे. त्यावर शिंदे गट नेमकं काय उत्तर देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून, 27 सप्टेंबर रोजी न्यायालयात नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com