लग्नसोहळे महागात? खासदार सुजय विखे पाटलांना कोरोनाची लागण

Sujay Vikhe Patil Corona Positive
Sujay Vikhe Patil Corona Positivee sakal

अहमदनगर : गेल्या ३० डिसेंबरला राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Radhakrishna Vikhe Patil Corona Positive) आली. त्यानंतर आता त्यांचे सुपूत्र आणि खासदार सुजय विखे पाटील यांना देखील कोरोनाची लागण (MP Sujay Vikhe Patil Corona Positive) झाली आहे. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे पिता-पूत्र दोघांनीही एका लग्नात हजेरी लावली होती. आता या लग्नात उपस्थित असणाऱ्या नेतेमंडळींना लग्नसोहळा चांगलाच महागात पडणार असल्याचं दिसतंय.

Sujay Vikhe Patil Corona Positive
लग्न ठरलं सुपर स्प्रेडर; नवरीच पॉझिटिव्ह, मंत्र्यांसह राज्यपालही होते उपस्थित

सुजय विखे पाटील विलगणीकरणात -

लग्नात उपस्थिती दर्शवलेल्या खासदार सुजय विखे पाटलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. ''आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, खबरदारी म्हणून मी स्वतः विलागीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी,'' असं आवाहन सुजय विखे पाटलांनी केलं आहे. पण, आता हेच सुजय विखे पाटील लग्नात उपस्थित होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

लग्न भोवणार? -

अहमदनगरमध्ये भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिलेचा विवाह सोहळला पार पडला. यामध्ये भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर लगेच राधाकृष्ण विखे पाटलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाजी कर्डीले यांच्या घरच्या लग्नात कोरोना झालेले विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस अगदी जवळ बसल्याचे दिसून आले. आता सुजय विखे पाटलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लग्नात उपस्थित नेतेमंडळींना धडकी भरल्याचे दिसून येतेय.

Sujay Vikhe Patil Corona Positive
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भीमा-कोरेगाव येथे बोलताना कोरोनाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. अधिवेशनाच्या काळात राज्यातील 10 मंत्री 20 आमदार कोरोना बाधित झाले, असं अजित पवारांनी सांगितलं. तसेच ५० च्या वर कार्यक्रमात उपस्थिती असेल तर मी कुठल्याही कार्यक्रमाला जाणार नाही, असंही पवार म्हणाले.

आतापर्यंत कोणाला कोरोनाची लागण? -

  1. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

  2. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

  3. आदिवासी मंत्री के. सी. पाडवी

  4. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

  5. महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

  6. खासदार सुप्रिया सुळे

  7. आमदार सागर मेघे

  8. आमदार राधाकृष्ण विखे पाटील

  9. आमदार शेखर निकम

  10. आमदार इंद्रनील नाईक

  11. आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)

  12. आमदार माधुरी मिसाळ

  13. माजी मंत्री दिपक सावंत

  14. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

  15. भाजप नेत्या पंकजा मुंडे

  16. खासदार सुजय विखे पाटील

  17. हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com