आता आदित्य ठाकरेंना धक्का; वरळीतील माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश: Maharashtra Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics

Maharashtra Politics: आता आदित्य ठाकरेंना धक्का; वरळीतील माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटात इनकमिंग सुरु आहे. राज्यातील अनेक मतदार संघातील नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभेत मोठा धक्का बसला आहे.(Maharashtra Politics Aaditya Thackeray CM Eknath Shinde Santosh Kharat Shivsena worli)

शिवसेना माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदे गटात सामील झाला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते.

T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहे. आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातला माजी नगरसेवक गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीलाही बसणार धक्का

तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtra Politics