
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याने घमसान माजले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांना घेऊन का फिरतात? राज्य सरकारमध्ये सर्व आलबेल आहे ? असे अनेक सवाल उपस्थित होताना दिसत आहे. (Maharashtra Politics cm Eknath Shinde alone on delhi tour no bjp leader )
वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, यामध्ये भाजपचा एकही नेता नसल्याने राज्य सरकारमध्ये सर्व आलबेल आहे ? अशा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.
महाराष्ट्राचे ३ लाख कोटीपेक्षा जास्त किंमतीचे प्रकल्प केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पडून आहेत. आता या प्रकल्पाला मंजूरी मिळावी म्हणून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना घेऊन दिल्ली दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत भाजपचा एकही मंत्री नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपल्याच गटातील उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे सोबत असणार आहे.
याआधी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत होते. विशेष बाब म्हणजे या सर्व राजकीय भेटी होत्या. मात्र, जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडायचा प्रश्न आला तेव्हा शिंदे यांच्यासोबत भाजपचा एकही राज्यातील नेता नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.