Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

Congress claims MLC opposition leader post: विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची काँग्रेस नेत्यांनी भेटही घेतली आणि ‘ही’ मागणी देखील केली
Congress leaders stake claim for the Legislative Council opposition leader post, creating a political dilemma for Uddhav Thackeray in Maharashtra.

Congress leaders stake claim for the Legislative Council opposition leader post, creating a political dilemma for Uddhav Thackeray in Maharashtra.

esakal

Updated on

Congress Stakes Claim for MLC Opposition Leader Post: महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद सध्या रिक्त आहे. या दरम्यान महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या काँग्रेसने त्यांचा सहकारी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समोर एक पेच निर्माण केला आहे. आज(सोमवार) वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेत्याचे पद भरण्याचा निर्णय घेण्यासाठी आग्रह देखील केला, हे पद मागील महिनभरापासून रिक्त आहे.

काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना सांगितले की, विरोधी पक्षनेत्याच्या अनुपस्थितीचा विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्येच समाप्त झाला आहे, तेव्हापासून हे पद रिक्तच आहे.

तर पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसने नियुक्तीबाबत महाविकास आघाडीतील आपल्या सहकाऱ्यांशी चर्चाही सुरू केली आहे आणि ते या प्रक्रियेला वेग आणू इच्छित आहे.  या पार्श्वभूमीवर मीडियाशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, काँग्रेसने आधीच विरोधी पक्षनेते पदावर दावा करत एक पत्र सादर केले आहे आणि सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन निर्णय लवकरात लवकर घेतला जावा याची मागणी केली आहे. आता काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे.

विधिमंडळाच्या ७८ सदस्यीय वरिष्ठ सभागृहात म्हणजे विधानपरिषदेत काँग्रेसचे सात आमदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन आमदार आहेत. तर तीन आमदार अपक्ष आहेत. याशिवाय भाजपचे २२ आमदार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सात आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार आहेत. सद्यस्थितीस एकूण २२ जागा रिक्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com