Deepali Sayyad यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपकडून विरोध; प्रवेशाला तारीख पे तारीख

दिपाली सय्यद आज शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
Dipali sayyad
Dipali sayyad esakal

ठाकरे गटात नाराज असलेल्या दिपाली सय्यद आज शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, भाजपकडून त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध दर्शवला आहे. (maharashtra politics crisis bjp opposed Dipali sayyad join shinde camp )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दीपाली सय्यद यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध आहे. शिंदे गटाने पक्ष प्रवेश दिल्यास भाजप- शिंदे गटातील संबंधांमध्ये तणाव निर्णाण होऊ शकतो. या भीतीने शिंदे गटातील प्रवेश लांबवला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी दिपाली सय्यद यांनी प्रयत्न केले. प्रयत्न असफल ठरल्याने त्या नाराज होत्या. बुधवारी ९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना, येत्या शनिवारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्षप्रवेश पुढे ढकलत रविवारी १३ नोव्हेंबरला ठेवण्यात आला.

दरम्यान, भाजपकडून त्यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला आहे.

भाजपकडून तीव्र विरोध

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे दिपाली सय्यद यांना भाजपने शिंदे गटातील प्रवेशाला विरोध दर्शवला होता. पंतप्रधानांची जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत शिंदे गटात प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. शिंदे गटातील अनेक नेत्यांकडूनही सय्यद यांच्या प्रवेशाला अंतर्गत विरोध आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची यामुळे गोची झाली असून सय्यद यांना प्रवेश द्यायचा की नाही. याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी हा विरोध केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर अत्यंत वाईट भाषेत टीका केली होती. त्यामुळे त्यांनी मोदी आणि भाजपची जाहीर माफी मागावी, तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा, असं मृणाल पेंडसे यांनी सांगितलं.

मोदी आणि भाजपवर टीका करणाऱ्या व्यक्तीला खरंतर प्रवेशच देऊ नये. आम्ही महिला आघाडीच्यावतीने सय्यद यांच्या पक्षप्रवेशाचा जाहीर विरोध करत आहोत, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांचा आदर करतात. पण कोणतीही विचारधारा नसणारी, आपली मते सातत्याने बदलणारी, तसेच कुठली पात्रता नसलेल्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी वाचली.

महाविकास आघाडीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत दिपाली सय्यद यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या दिपाली सय्यद यांना आमचा विरोध आहे, असं त्या म्हणाल्य आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com