गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या गोटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra politics Gulab Raghunath Patil support eknath shinde jalgaon

गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या गोटात

जळगाव : माझ्या रक्तात शिवसेना आहे. आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. पक्ष बदलणार नाही मी गुवाहाटीला चाललो आहे. राज्यातील शिवसेनेचे बहुतेक मंत्री-नेते गेले. तसेच जिल्ह्यातील तीन जणही गेले, मी एकटा काय करू, असे मत शिवसेनेचे फायरब्रँड नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना व्यक्त केले.शिवसेना वाढविण्यासाठी संघर्ष करणारे तसेच टपरीधारकापासून तर थेट मंत्रिपदापर्यत पोहोचलेले फायब्रँड नेते म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात त्यांनी कष्ट घेतले आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जण असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या चारपैकी तीन आमदार अगोदरच गुवाहाटी येथे गेले आहेत.

मंत्री गुलाबराव पाटीलही नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीतही चर्चा सुरू होती. त्यांच्याशी ‘सरकारनामा’ने संपर्क साधला. ते म्हणाले, की होय मी गुवाहाटीला चाललो आहे. जिल्ह्यातील तीन जण गेले आहेत. इतरही गेले आहेत. मी एकटा राहून काय करू?

शिवसेनेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वच आभाळ फाटले आहे. त्यामुळे आता ते सांधणही कठीण आहे. वातावरण पाहून पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा होता. परंतु आता त्याचीही वेळ निघून गेली आहे. आम्ही शिवसेनेतच राहणार आहोत. शिवसैनिक म्हणूनच कार्य करणार आहोत. कारण शिवसेना आमच्या रक्तात आहे.

- गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री

Web Title: Maharashtra Politics Gulab Raghunath Patil Support Eknath Shinde Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top