Maharashtra Politics LIVE : आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री साधला माध्यमांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray on Raj Thackeray Aurangabad Meeting

Maharashtra Politics : आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री साधला माध्यमांशी संवाद

मुंबईत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री मातोश्री बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

अपक्ष आमदार गिता जैन आणि जोरगेवार हेदेखील गुवाहटीतील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे शिंदेच्या गटातील आमदरांची संख्या वाढत आहे.

शिवसेनेला धक्क्यावर धक्के - आणखी तीन आमदार सुरतला रवाना होणार

 • शिवसेनेचे ३ आणि अपक्ष ५ असे मिळून ८ आमदार आज रात्री सुरतला पोहोचणार असल्याची माहिती आहे. सुरतल्या गेल्यावर ते गुवाहटीला जाणार असल्याची माहिती समोर आली असून या तीनही आमदारांची नावे समोर आली नाहीत.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे इशारा दिला आहे.

 • कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत असं शिंदेंनी म्हटलं आहे.

 • 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.

 • कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे. असे तीन ट्वीट शिंदेंनी केले आहेत.

नारायण राणे यांचं शरद पवारांना आव्हान

शरद पवारांनी बंडखोर आमदारांना इशारा दिल्यानंतर भाजपचे नारायण राणे यांनी शरद पवार यांनाच इशारा दिला आहे. तसेच संजय राऊत यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. "संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा." असं ट्वीट करत शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

"तसेच शरद पवार सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', असं ते म्हणाले आहेत पण ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास तुम्हाला घर गाठणे कठीण होईल." अशी जाहीर धमकी नारायण राणे यांनी दिली आहे.

मोठी अपडेट : ठाकरे समर्थक सेनेचं शिष्टमंडळ विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले असून बैठकीला गैरहजर राहिलेल्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी नरहरी झिरवळ यांना पत्र लिहिलं आहे. दरम्यान अरविंद सावंत यांनी १२ आमदारांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

मातोश्रीवरील शिवसेना प्रमुखांची बैठक संपली आहे. पक्षवाढीवर लक्ष द्या अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच नवं ट्वीट

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या शिवेसनेच्या आमदाराचा व्हिडिओ ट्वीट करत मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये शिवेसनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या नेतृत्वाबद्दलच्या नाराजीचा पाढा वाचून दाखवला आहे.

शरद पवार म्हणाले...

 • महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात अनेक चांगले कामं केले, मोठे निर्णय घेतले, उत्तम कारभार केला.

 • आमचं काम पाहता मविआ सरकारचा प्रयोग फसला म्हणणं राजकीय अज्ञान म्हणावं लागेल. गुवाहटीवरून आमदार परतले की मविआ सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहे. त्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

 • आमदार इथे आले की ते गुवाहटीला का गेले होते ते समजेल. पण सध्या माध्यमांसमोर आलेलं वास्तव नाकारता येणार नाही.

 • एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार कोणत्या राष्ट्रीय पक्षासोबत जाणार आहेत हे आम्हाला माहितीये.

 • गुवाहटीतील शिवसेनेच्या आमदारांनी पत्रात केलेल्या निधीबद्दलच्या आरोपात वस्तुस्थिती नाही.

 • अजित पवारांना स्थानिक माहिती आहे पण गुजरात आणि आसामची माहिती त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती आहे.

 • ते भाजपसोबत गेले तर महाराष्ट्रात भाजप त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही, त्यांना परिणाम भोगावे लागतील.

 • बंडखोरांना महाराष्ट्रातील विधानसभाच्या प्रांगणात यावंच लागेल, त्यांना गुवाहटीला मदत कोण करतंय ते पहावं लागणार आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.

 • नवी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे.

 • शिवसेनेचे आणखी एक नेते नॉच रिचेबल, राजेश क्षीरसागर यांचा संपर्क तुटला आज सकाळीच शिंदे यांची त्यांच्याशी चर्चा झाली होती.

एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय

 • एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून ते आपल्या आमदारांना संबोधित करताना दिसत आहेत. त्यांनी यावेळी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 • भाजप आपल्या निर्णयाला काही कमी पडू देणार नाही, त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय. आपल्या सर्वांचं सुखदु:ख एकच आहे असं बोलताना ते दिसत आहेत.

 • बंडखोर आमदारांनी आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केलेली आहे.

नाना पटोलेंच्या विधानावर अजित पवार नाराज, काय म्हणाले वाचा

 • कायमच आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे. आम्ही सर्वांनी मिळून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं आहे. आमचा प्रयत्न महाविकास आघाडी टिकवण्यसाठी असणार आहे.

 • आमच्या मित्रपक्षांकडून निधीबाबत काही आरोप केला जात आहे पण मी निधीसाठी कुणामध्ये दुजाभाव केला नाही.

 • सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे पण त्यांनी तसं वक्तव्य का केलं हे माहिती नाही.

 • राऊतांनी अगोदर महाविकास आघाडी २५ वर्षे टिकेल असं सांगितलं होतं पण त्यांनी आता वेगळं विधान केलंय. राऊतांनी केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. कदाचित आमदारांना परत आणण्यासाठी राऊत तसं बोलले असावेत.

 • एकनाथ शिंदे यांच्या बंडात अजूनतरी भाजपचा रोल दिसत नाही. शिवसेनेतील आत्तापर्यंतचं हे तिसरं बंड आहे. शिवेसनेशी बंड करणाऱ्याचं अस्तित्व राहत नाही असा शिवसेनेचा इतिहास आहे ही गोष्ट बंड करणाऱ्याला समजली पाहिजे.

 • एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार स्वखुशीने गेले की बळजबरीने गेले ते शोधावं लागणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना शेवटपर्यंत साथ देणार आहोत.

 • मी कधीच कोणत्या आमदाराला कमी निधी दिला नाही, कुणासोबतच भेदभाव केला नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

उद्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. उद्या सकाळी १० ते ११ वाजता शिवसेनाप्रमुख जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत.

 • दरम्यान बंडखोरी करणाऱ्याला किंमत मोजावी लागेल असा इशारा शरद पवारांनी शिंदे गटाला दिला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला आहे.

 • काँग्रेसचे महाविकास आघाडीला कायम समर्थन असेल, भाजपला रोखण्यासाठी आजही आम्ही मविआसोबत आहोत असं नाना पटोले म्हणाले आहेत.

 • भाजप सत्ता, पैशाच्या जोरावर अनेक राज्यांत सरकार अस्थिर करत आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भाजपचे हे कारस्थान फार दिवस चालणार नाही लवकरच त्यांना सत्तेवरून खाली उतरावे लागेल असा इशारा ममता यांनी दिला आहे.

 • अजित पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी देत नव्हते त्यामुळे शिवसेना आमदार नाराज झाले आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

 • महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आसाममधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुवाहटीच्या हॉटेलबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी आसाममधील भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

 • एकनाथ शिंदे गट उद्या आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती आहे.

 • आमच्या कडे ४१ आमदारांचं संख्याबळ असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 • शिवसेनेचे ४१ आणि ६ अपक्ष अशा सर्व ४७ सह्यांचं पत्र पाठवणार आहेत.

 • आज आणखी काही आमदार गुवाहटीला येणार असल्याने त्यांच्याही सह्या घेऊन पत्र पाठवणार असल्याची माहिती आहे.

रविंद्र फाटक हेसुद्ध गुवाहटीला रवाना झाले आहेत. फाटक हे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाला समजावण्यासाठी गेले होते. तेच फाटक आता गुवाहटीला पोहोचले आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत दादा भुसे आणि संजय राठोड हेसुद्धा आहेत. रविंद्र फाटक हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात.

घरचे दरवाजे उघडे आहेत, चर्चेतून मार्ग निघू शकतो उगाच कशाला वणवण भटकायचं? असं संजय राऊत शिंदे यांना उद्देशून म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटाची गुवाहटी येथील बैठक संपलेली आहे. यावेळी शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार असल्याचं ठरवलं गेलं असून एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. राऊतांच्या वक्तव्यानंतरही सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर शिंदे ठाम आहेत.

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनीही बैठक बोलावली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी गृहविभागाची बैठक बोलावली असून या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, अजित पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत.

संजय राऊत यांच्या महाविकास आघाडी सोडण्याच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. सह्याद्री अतिथीगृहात काँग्रेसची बैठक सुरू असून एच. के. पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसची बैठक पार पडणार आहे.

वेळ पडली तर विरोधी पक्ष म्हणून बसू असं वक्तव्य काँग्रेसच्या नाना पटोले यांनी केलं आहे. राऊतांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर गद्दारांना गाडून पुन्हा भगवा फडकवू असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या १८ आमदारांनी आमच्यासोबत संपर्क केला असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.

काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे -

आमच्या पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम करत आहोत पण भाजपा महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीशी चर्चा करून विधान करा असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत. सत्ता येत असते जात असते त्याची चिंता नाही. मार्ग निघू शकतो पण राऊतांनी जे विधान केलं आहे त्याआधी त्यांनी चर्चा करायला हवी होती असं भुजबळ म्हणाले आहेत.

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा हे गुवाहटी येथील रेडिसन्स ब्लू या हॉटेलमध्ये आले आहेत. ते महाराष्ट्रातील बंडखोर शिवसेना आमदारांना भेटण्याची शक्यता आहे. नॅशनल पीपल्स पार्टीचे ते प्रमुख आहेत.

मी पायी चालत महाराष्ट्रात आलो असं सांगणाऱ्या कैलास पाटील यांची मुंबईला जाण्याची सोय आम्हीच केली, ते काहीतरी वेगळं सांगून दिशाभूल करत आहेत असं शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.

कृषीमंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड गुवाहटीला रवाना

जयंत पाटील : आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेबरोबर आहोत, या सरकरला वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत.

शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि जैस्वाल हे गुवाहटीमधील त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. ते हॉटेवमधून बाहेर पडून कुठे गेले याची अधिकृत माहिती अजून समोर आली आहे. पण ते खरेदीसाठी बाहेर पडले असल्याची माहीती आता समोर येत आहे. 

गोंदिया येथील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ही नाट्यमय घडामोडी चालू असताना काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी सांगितलेल्या अनुभवाचा उल्लेख करत ते म्हणाले की, "सत्तेसाठी भाजपा खालच्या पातळीवर जाऊन हवी तशी गुंडगिरी करत सुटले आहे! जिथे हे आमदारांची अशी अवस्था करतात तिथे सर्व सामान्य जनतेचे काय हाल करतील?" असा सवाल त्यांनी ट्वीट करत केला आहे.

एक किलोमीटर पायी प्रवास केला, फसवणूक करून आपल्याला गुजरातला नेलं, असे गंभीर आरोप शिवसेनेच्या आमदारांनी केले आहेत. शिंदे गटातून नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे आमदार बाहेर पडले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत हे खळबळजनक आरोप केले आहेत.

हेही वाचा: शिंदे गोटातून परतलेल्या आमदारांचे खळबळजनक आरोप; अनेक आमदारांना...

एकनाथ शिंदेंसोबत सध्या ४२ आमदारांचं संख्याबळ आहे. एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये या आमदारांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या माध्यमातून आता त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही आव्हान दिलं आहे. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी सुरू आहे. हीच खरी शिवसेना, असा दावा होतोय.

आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणाबाजी सुरू आहे. हीच खरी शिवसेना, असा दावा होतोय.शिवसेनेच्या बैठकीला फक्त १३ आमदार

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सेनेचे बहुतांश आमदार त्यांच्या बाजूने गेले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकांनाही वेग आलेला आहे. शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेचे केवळ १३ आमदार उपस्थित असल्याचं दिसून आलं. बैठकीला उपस्थित असलेले आमदार खालीलप्रमाणे:

 • अजय चौधरी

 • रवींद्र वायकर

 • राजन साळवी

 • वैभव नाईक

 • नितीन देशमुख

 • उदय सामंत

 • सुनील राऊत

 • सुनील प्रभू

 • दिलीप लांडे

 • राहुल पाटील

 • रमेश कोरगावकर

 • प्रकाश फातरपेकर

 • उदयसिंह राजपूत

फडणवीसांनी संधी साधली!

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आजही भाजपचे काही नेते पोहोचले आहेत. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर फडणवीस तातडीने दिल्लीला गेले होते. पक्षश्रेष्ठींची चर्चा करून ते महाराष्ट्रात परतले. आता आशिष शेलार, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, नितेश राणे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर सध्या फडणवीसांच्या शासकीय बंगल्यावर दाखल झाले आहेत.

भाजपकडून सत्ता समीकरणाच्या हालचाली सुरू

एकनाथ शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर असल्याची चर्चा आहे. राज्यात 8 कॅबिनेट मंत्रिपदं आणि 5 राज्यमंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदेनाही केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. तर राज्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असू शकतात.

संजय राठोड, दादा भुसे यांच्यासारख्या शिवसेनेच्या गटातील व्यक्तींची महामंडळांवरही वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.

४१ खासदार... ७ अपक्ष आणि १२ खासदार!

आमदारांच्या बंडखोरीची चर्चा असतानाच आता बारा खासदारही शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवसेनेचे 18 खासदार असून बारा खासदार शिंदे यांच्यासोबत जाणार असतील तर हा ठाकरेंसाठी आणखी मोठा धक्का असेल. त्यामुळे आता ठाकरे पुढे काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

संख्याबळ शिंदेंकडे... खरी शिवसेना कोणाची?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीला यश आलं आल्याचं दिसतंय. सेनेचे जवळपास ४१ आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं कळतंय. मुंबई, खान्देश, कोकण आणि मराठवाड्यातील मोठं संख्याबळ एकत्र करण्यात शिंदेंचा प्लॅन यशस्वी झालाय. आता ठाकरे यांना सहकार्य करणारे फक्त १४ आमदार उरले आहेत.

याशिवाय तत्काळ सहा अपक्ष, यामध्ये नरेंद्र भोंडेकर, आशिष जैस्वाल आणि बच्चू कडू गटातले अन्य काही आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे चेहरे शिंदे गटात!

आणखी चार आमदारांसोबत आशिष जैस्वाल गुवाहाटी पोहोचत असल्याची माहिती मिळतीय. त्यामुळे शिंदे यांनी सांगितलेला ४० आमदारांचा आकडा आता पूर्ण होणार असल्याचं दिसतंय.

- शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैसवाल गोवाहटीसाठी निघाल्याची माहिती

- शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जैसवाल नॅाटरिचेबल होते

- मंत्री टक्केवारी मागत असल्याचा गौप्यस्फोट करुन उडवून दिली होती खळबळ

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आमदार म्हणून जैसवाल यांची ओळख

मंत्री गुलाबराव पाटलांनंतर शिवसेनेला आज सकाळी आणखी एक धक्का बसलाय. कोकणातील सेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यामुळं दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढत असल्याचं स्पष्ट झालंय.

दीपक केसरकर हॉटेलमधून बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी त्यांची अडवणूक केली होती.

सेनेचे नेते दीपक केसरकर गुवाहाटीत, एकनाथ शिंदेंच्या गटात झाले सामील.

Maharashtra Politics LIVE : सत्तेचा सस्पेन्स वाढत असून एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलंय. जवळपास ४१ आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. ते उद्या आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. आपण भाजपसोबत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून याचा व्हिडिओ समोर आला आहे. (Maharashtra Politics)

Web Title: Maharashtra Politics Live Maharashtra Political Crisis Eknath Shinde Latest Update Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top