Abdul Sattar: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर? केसरकर सत्तारांबाबत म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar

Abdul Sattar: शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर? केसरकर सत्तारांबाबत म्हणाले...

राज्यात सत्तासंघर्षानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सत्तेत आल्यापासून अनेक वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. अशातच गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी सत्तार वादात आले आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघालं. दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सत्तार यांच्यावर भाष्य केलं आहे. (Maharashtra Politics Minister Deepak Kesarkar Abdul Sattar Shinde Group )

माध्यमांशी बोलताना सत्तार केसरकर यांनी सत्तारांना किती गांभीर्याने घ्यायचे हे मला माहिती नाही असं वक्तव्य केलं. आणि अधिक बोलण्याचे टाळलं.

काय म्हणाले सत्तार?

अब्दुल सत्तार अनेकवेळा गमतीने बोलत असतात. त्यामुळे ते किती गंभीरतेने घ्यायचे हे मला माहीत नाही. काही झाले असेल तर निश्चितपणे त्यात लक्ष घातले जाईल. पण पक्षांतर्गत घडामोडी झाल्या असतील तर त्याच्या चर्चा बाहेर करायच्या नसतात.

या प्रकरणात मुख्यमंत्री आवश्यक तो निर्णय घेतील. पक्षांतर्गत बाबींची जाहीर चर्चा करण्याची पद्धत कुठल्याही पक्षात नसते. आमच्याही पक्षात तशी पद्धत नसते. याची आम्ही काळजी घेऊ.

सत्तार नेमकं काय म्हणाले?

माझ्यावरील आरोपांनंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे माझी बाजू मांडली आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातीलही काही लोक असू शकतात. मंत्रिपद न मिळालेल्या नेत्याचं माझ्याविरोधात षडयंत्र आहे.

विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. आमच्या पक्षाच्या बैठकीतल्या काही बातम्या बाहेर येत आहे. काही दिवसांआधीच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. त्या बैठकीत काय झालं ते बाहेर आलं. याबाबत मी मुख्यमंत्री शिंदेंच्या कानावर घातलं असून मी चौकशीची मागणी केलीय”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.