Ajit Pawar : अजित पवार राजकारणातून बाहेर पडणार?

हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली
Ajit Pawar
Ajit PawarEsakal

हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस राहिले आहेत. हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली होती. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना आव्हान दिलं होतं की, बारामतीमध्ये जाऊन मी राष्ट्रवादीला हरवून दाखवेन जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, शिवसेनेचा केला तसा राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम करेन असं ते म्हणाले होते. त्यावर अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले की, बावनकुळे यांच्या आव्हानामुळे मला झोप लागत नाही अशी उपहासात्मक टीका केली आहे.

तर पुढे ते म्हणाले की यामुळे मी राजकारणातून संन्यास घेतो असंही अजित पवार पुढे म्हणाले आहेत.बबोलताना ते म्हणाले की, मी राजकारणातून संन्यास घेतो बावनकुळे यांच्या इतक्या ताकदीचा नेता माझा करेक्ट कार्यक्रम करणार त्यांच्या आव्हानामुळे मुळे मी घाबरलो असंही अजित पवार उपहासात्मक टीका करत म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Sharad Pawar : पवार कुटुंबाच्या सीबीआय चौकशीची मागणी; काय आहे कारण?

पुढे अजित पवार म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे बोलल्यापासून मला झोपच येईना. हे ऐकल्यापासून आमच्या सर्वांची झोप हरपली आहे. बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, त्यामुळे मी विचार करतोय राजकारणच सोडावं. राजकारणातून संन्यास घ्यावा. 2024ला असा अपमान होण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घेतलेला बरा, अशी मिश्किल आणि उपहासात्मक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Ajit Pawar
Urfi Javed: राहुल गांधींना ट्रोल केल्याने भाजप नेत्यावर उर्फी जावेद भडकली, म्हणाली...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल अजित पवार यांचा वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा दिला होता. हा इशारा ऐकल्यापासून माझी झोपच उडालीये... मला तर आता राजकीय सन्यास घ्यावासा वाटतो असा मिश्कील टीका विधान सेभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधान भवनासमोर माध्यमांशी बोलताना केली होती.

Ajit Pawar
BMC: मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील; आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

पुढे बोलताना अजित पवार म्हणालेत की, तीन आठवड्याचे अधिवेशन व्हावे, अशी आमची इच्छा होती. पण सत्ताधाऱ्यांचं बहुमत असल्याने त्यांनी दोन आठवड्यांचं कामकाज निश्चित केलं असे पवार म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावात सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांवर करण्यात आलेल्या बेताल वक्तव्यासंदर्भात, मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात, भ्रष्टाचार, महिला सुसक्षा या विषयांचा समाविष्ट असेल.

अब्दुल सत्तार हे दोषी आहेत. कुठल्या कालावधीत त्यांनी भ्रष्टचार केला होता, उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क देणे गौण आहे. प्रकरण लक्षात आल्यानंतर विरोधकांचे कामच आहे सभागृहात उचलण्याचे, असे पवार म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com