BJP: पंकजा मुंडे भाजपला ठोकणार राम राम? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पंकजा मुंडें यांच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चेला उत
 (maharashtra politics Pankaja Munde May Quit Bjp Says Ncp Mla Amol Mitkari )
(maharashtra politics Pankaja Munde May Quit Bjp Says Ncp Mla Amol Mitkari )esakal

दोन दिवसांपूर्वी, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही. असा इशारा त्यांनी दिला. तसेच, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना , मी बेरोजगार आहे.मी तुम्हाला काय रोजगार देऊ? असा उलट सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चेला उत आला आहे. (maharashtra politics Pankaja Munde May Quit Bjp Says Ncp Mla Amol Mitkari )

दरम्यान, राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडेंसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील असं मिटकरींनी म्हटलं आहे.

मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. भाषणादरम्यान, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी मला संपवू शकत नाही. अस वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.

मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी नेत्यांनी हा मुद्दा हाती घेत पंकजा मुंडे राष्ट्रवादीमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधान मिटकरींनी केलं आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहेत.

काय म्हणाले मिटकरी?

पंकजाताईंना डावलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमध्ये सुरु आहे. तो प्रयत्न फडणवीस सरकारकडून सातत्याने होतो आहे. आतापर्यंतही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली गेलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या कन्या आहेत. तोलामोलाच्या नेत्या आहेत. त्या महाराष्ट्रातील वजनदार नेत्या आहेत. पण आतापर्यंतही त्यांना न्याय मिळालेला नाही. म्हणूनच त्या अस्वस्थ आहेत. माझा विश्वास आहे की पंकजाताई लवकरच मोठा निर्णय घेतील.

मी मागंही म्हटलं होतं. सुप्रियाताईंनीही त्याचं समर्थन केलं होतं की जर पंकजाताईंसारख्या बड्या नेत्या पक्षामध्ये येत असतील तर स्वागत आहे. भाजपामध्ये त्या अस्वस्थ आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरुन त्या अस्वस्थ आहेत. भाजपाला त्या सोडचिठ्ठी देतील एवढं मात्र नक्की,” असं मिटकरींनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com