
कुर्डुवाडी येथील महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हिंदी भाषेतील बोलण्याच्या शैलीमुळे गैरसमज निर्माण झाला, ज्यामुळे हा वाद वाढला. अजित पवारांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली असली, तरी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि मीडियाने याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना अजित पवारांबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी अजितदादांची बाजू घेतली की टोमणा मारला? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.