

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक करण्यात आली. राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती समोर आली. मयूर शिंदे शिवसेनेचाच कार्यकर्ता असल्याची माहिती सध्या व्हायरल होत आहे. यावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे. दरम्यान, रात्री उशिरा संजय राऊत यांनी ट्विट करत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्या बातमीमुळे राऊतांची झोप उडाल्याची चर्चा रंगली आहे.(maharashtra politics sanjay raut midnight tweet on Mayur Shinde ShivSena BJP )
आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी एबीपी माझाच्या एका वृत्ताचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मयूर शिंदेनं तिकीट न मिळाल्यामुळे शिवसेनेतून भाजपात प्रवेश केल्याचं वृत्त दाखवण्यात आलं आहे. शिवाय, मयूर शिंदेच्या भाजपा प्रवेशाचे फोटोही दाखवण्यात आले. संजय राऊतांनी या व्हिडीओसह केलेल्या ट्वीटमध्ये सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर निशाना साधला आहे.
“जाहिरात कांडावरून लक्ष उडवण्यासाठी रचलेला हा बनाव. स्पष्टच दिसतंय. ठाणे परिसरातले सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकतर भाजपात आहेत, नाहीतर सध्याच्या शिंदे गटात. हे लोक आमच्यासाठी असं काही करतील, यावर कुणी मूर्खही विश्वास ठेवणार नाही. हे बनावट प्रकरण त्यातलंच आहे”, असं संजय राऊतांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नेमकं काय प्रकरण?
काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांच्या एका फोन संभाषणाची ही ऑडिओ क्लिप होती. यामध्ये समोरची व्यक्ती या दोघांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं ऐकू येत आहे. संजय राऊतांना रोज सकाळच्या पत्रकार परिषदा बंद करण्याची धमकी दिली जात आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी ही माहिती दिली आहे. मयुर शिंदे हा संजय राऊत यांच्या जवळचा आहे. मयुर शिंदेने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेने स्वत: फोन केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, राऊतांच्या ट्वीटनंतर आता मयूर शिंदे नेमका कोणत्या पक्षाचा? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.