Eknath Shinde: शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव का घेतली? वकील सिंघवी यांनी केला खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव का घेतली? वकील सिंघवी यांनी केला खुलासा

राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपुर्ण सुनावणी होत आहे. दरम्यान, सुनावणीला सुरूवात होताच ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. त्यांच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने एकनाथ शिंदे कोणत्या हक्काने निवडणूक आयोगाकडे गेले? असा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी शिवसेनेचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी यासंदर्भात खुलासा केला. (Maharashtra Politics Supreme Court Election Commission Eknath Shinde Abhishek Manusingh Singhavi)

सुनावणीदरम्यान, एकनाथ शिंदे १९ जुलैला निवडणूक आयोगात गेले होते. पण त्याआधी अनेक घडामोडी पार पडल्या आहेत. त्यामुळे त्या सर्व गोष्टींचा आधी निर्णय लागणं गरजेचं होतं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

यावेळी घटनापीठाने एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकाराने शिवसेनेचे चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे गेले? असा सवाल उपस्थित केला. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून की आमदार म्हणून निवडणूक आयोगाकडे गेले होते, असा सवाल घटनापीठाने विचारला.

यावर कपिल सिब्बल यांनी हाच मूळ मुद्दा आहे. प्रथम एकनाथ शिंदे हे कोणत्या अधिकारात निवडणूक आयोगाकडे गेले होते, हे स्पष्ट झाले पाहिजे, असं म्हटलं. दरम्यान, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सदस्य असल्यास निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात, असे घटनापीठाने म्हटले.

त्यानंतर, अपात्रतेची कारवाई आणि निवडणूक आयोगासमोरील सुनावणी एकमेकांशी संबंधित आहेत. दहाव्या अनुसूचीनुसार, शिंदे गटासमोर हा अपात्र अथवा विलिनीकरणाचा पर्याय आहे. दहाव्या अनुसूचीनुसार सध्या या गटाकडे विलिनीकरणाचा पर्याय आहे. मात्र, या कारवाईला, घटनेतील तरतुदीला टाळण्यासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपणच मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.