Maharashtra Politics : ठाकरे गटाला हायकोर्टाचा पुन्हा दणका; '५० खोके एकदम ओके' महागात पडलं

दिल्ली हायकोर्टानं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Uddhav Thackeraay Sanjay Raut
Uddhav Thackeraay Sanjay RautSakal

राज्यातल्या सत्तासंघर्षापासून चर्चेत असलेली घोषणा म्हणजे ५० खोके एकदम ओके. ठाकरे गटाने दिलेल्या या घोषणेमुळे आता त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. हायकोर्टाने या प्रकरणी त्यांना सुनावलं आहे.

“५० खोके एकदम ओक्के” हे शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाकावे, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी २००० कोटी देऊन निवडणूक आयोगाकडून चिन्ह खरेदी केलं. ५० कोटी देऊन आमदार खासदारांना विकत घेतले. "...शिवसेनेतून घाण निघाली आहे..." आणि "50 खोके एकदम ओके" अशा अनेक विधानांवर कोर्टाने आक्षेप नोंदवला आहे आणि ते सोशल मीडियातून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

Uddhav Thackeraay Sanjay Raut
Rahul Gandhi : "कोणतेही पूर्वग्रह न ठेवता मी..."; घर रिकामं करणाऱ्या नोटिशीला राहुल गांधींनी दिलं उत्तर

शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स बजावलं आहे. संजय राऊत यांनाही या खटल्यात समन्स बजावलं असून १७ एप्रिल रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदेंसह अनेक आमदार-खासदार पक्षातून वेगळे झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले. शिंदेंनी आमदार खासदार खरेदी केल्याचं विरोधक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून बोललं जाऊ लागलं.

Uddhav Thackeraay Sanjay Raut
Maharashtra Politics: अखेर पोटातलं ओठावर; 2019 मध्ये नेमकं काय घडलं? तानाजी सावंतांचा गौप्यस्फोट

यानंतर अधिवेशनात किंवा इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी, सभांमध्ये सोशल मीडियावर संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांवर टीका केली.

५० खोके एकदम ओके, ही त्यातली एक प्रमुख घोषणा होती. तसंच अनेकदा शिंदे गटावर टीका करताना ठाकरे गटाची जीभ घसरल्याचंही दिसून आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com