Maharashtra Pollution News: मुंबईची हवेची गुणवत्ता झाली कमी अन् महाराष्ट्राने घेतला धसका!

Mumbai Pollution
Mumbai Pollutionsakal

Maharashtra Pollution News: वातावरणातील बदलामुळे मुंबई व महाराष्ट्रातील इतर भागांत हवा प्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता मुंबई शहरात महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर आता राज्यातील इतर शहरे, ग्रामीण विभागामध्ये हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी दिले आहेत.

Mumbai Pollution
Mumbai Pollution News : मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा लागली कामाला; आयुक्तांनी दिले कडक निर्देश !

मुंबई शहर वगळता राज्यातील इतर शहरे, ग्रामीण विभाग यामध्ये हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणीकरीता महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांना पर्यावरणविषयक पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून मार्गदर्शक सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे:

- पालिका क्षेत्रातील ५० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान २५ फूट उंच धातूचे पत्रे लावले जावेत. पालिका क्षेत्राबाहेर किमान २० फूट उंच पत्र्याचे बंधन असेल.

- बांधकामाधीन सर्व इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या हिरव्या कापडाचे ताडपत्रीने आवरण आवश्‍यक असेल.

- बांधकामाच्या ठिकाणी साहित्याची ने-आण करताना पाण्याची फवारणी करणे बंधनकारक राहील.

- बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनास पूर्णपणे आच्छादन केलेले असावे.

- सर्व बांधकाम प्रकल्पस्थळी सेन्सर-आधारित वायू प्रदूषण मोजमापन यंत्रणा असावी.

- फॉगिंग सतत केले जावेत, जेणेकरून हवेत पसरणाऱ्या धूलिकणांपासून बचाव होण्यास मदत होईल.

Mumbai Pollution
Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचं प्रदूषण वाढलं; बीकेसी आणि चेंबूर ‘ऑरेंज झोन’मध्ये

- सर्व बांधकाम कर्मचारी/व्यवस्थापकांनी अनिवार्यपणे वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे परिधान करणे आवश्यक आहे.

- वायू प्रदूषण रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत.

-पाहणी पथकाने संबंधित परिसराला भेट देऊन, कार्यस्थळाची चित्रफीत काढावी. नियमांचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करावी.

- बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांवर वाहन ट्रॅकिंग यंत्रणा बसवावी.

- हे परिपत्रक जारी केल्यापासून सर्व प्रकल्प प्रस्तावक/कंत्राटदारांना स्प्रिंकलरच्या खरेदीसाठी १५ दिवसांची आणि स्मॉग गनच्या खरेदीसाठी ३० दिवसांची मुदत असेल.

Mumbai Pollution
Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचं प्रदूषण वाढलं; बीकेसी आणि चेंबूर ‘ऑरेंज झोन’मध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com