
मुंबई : राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व नोंदणी नियंत्रकांच्या आदेशानुसार २०२२-२३ नंतर राज्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार एक एप्रिलपासून महागणार आहेत. महापालिका क्षेत्रात (मुंबई वगळता) रेडीरेकनर दरात सरासरी ५.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर ग्रामीण भागात ३.३६ टक्क्यांनी रेडीरेकनर दर वाढणार आहे. या नव्या दराची अंमलबजावणी उद्यापासून (१ एप्रिल) होणार आहे.