

दुष्काळाचं सावट, रब्बी हंगामाची चिंता; शेतकऱ्यांसाठी महाबीजने आखलं ३.९८ लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन
esakal
महाराष्ट्रात एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे पावसाचे प्रमाण आणि शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजने २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी बियाण्यांचे नियोजन केले आहे. या हंगामात शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी एकूण ३ लाख ९८ हजार ४९३ क्विंटल बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.