

Drought Hits Maharashtra Farmers: Rabi Sowing Falls to Just 27% of Five-Year Average
Esakal
Maharashtra Rabi sowing 2026: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा फटका यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीला बसला आहे. राज्यात २३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत केवळ १५.६९ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. हे क्षेत्र राज्याच्या पाच वर्षांच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या अवघे २७ टक्के आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी याच कालावधीत २५.९९ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ४५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती.