
महाराष्ट्रात सध्या पावसाने थैमान घातले आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.