
अखेर पाऊस काल राज्यात दाखल झाला. पण पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. पहिल्याच पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
कमरेपर्यंत पाणी, गाड्यांना रस्सीने बांधण्याची नामुष्की मुंबईकरांवर आली आहे. हे पाहताच मुंबईकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पण मुख्यमंत्री शिंदे यांनी तुंबलेल्या मुंबईवर न बोलता आलेल्या पावसाचं स्वागत करा असे आवाहन केलं. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. Maharashtra rain CM Eknath Shinde says welcome rain
मुख्यमंत्री शिंदेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी एका पत्रकाराने तुंबलेल्या मुंबईसंदर्भात सवाल उपस्थित केला असता. अपेक्षीत उत्तर न देत मुख्यमंत्री शिंदेंनी अजब उत्तर दिले असल्याचे पाहायला मिळालं.
पत्रकारांनी मुंबईत पहिल्याच पावसानंतर पाणी तुंबल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे बाबा, पाऊस झालं याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत.”
नेमकं काय म्हणाले शिंदे?
पाऊसाची चांगली सुरुवात झाली आहे. बळीराजा आणि आपण सगळे त्याचं आनंदाने स्वागत करुयात. गेले अनेक दिवस आपण पावसाची आतुरतेने वाटत पाहत होतो. आज पाऊस चांगला सुरू झाला आहे. राज्यभर पेरण्या झाल्या आहेत. आजचा पाऊस शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाऊस झाल्याने सर्वांनाच मनापासून आनंद झाला आहे.
पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली. या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यांना थेट नाल्यांचं स्वरुप प्राप्त झालं. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. पावसाळ्यापूर्वी मुंबईत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.