Weather Update: मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले ; पुढील 5 दिवस पुन्हा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - चिपळूण तालुक्‍याला शनिवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपले.

आणखीन 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटसह काही ठिकाणी पाऊस पडणार.

मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. आणखीन पुढे 4-5 दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटसह काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याबरोबरच कोकणात (Konkan)ढगाळ हवामान, पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह गडगडाटी वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेले दोन दिवस मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाडा, विदर्भ (Mumbai, Pune, Kolhapur, Sangli, Satara, Beed, Ratnagiri, Sindhudurg, Marathwada, Vidarbha)जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. आज मुंबईत वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. भात काढणी पिकाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.

परिसरात ढगाळ वातावरण

गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरणानंतर थंडीची सुरुवात झाली. थंडी पडली असतानाच पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडी गायब झाली आहे. दमट वातावरणामुळे उष्म्यात वाढ झाली आहे. सध्या ऊस तोड हंगाम जोरात सुरु आहे. पावसाच्या भितीने उसाची तोड लगबगीने करण्याची शिवारात धांदल उडाली आहे. रब्बी ज्वारीसाठी पावसाची आवश्यकता असली तरी त्याची हुलकावणी मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नव्या उसाची लागणही सुरु झाली आहे. अशा वातावरणामुळे या कामातही व्यत्यय येत असल्याचे सांगण्यात येते.

चिपळुणात पावसाच्या सरी सुरूच

कोकणात पर्यटन सुरु झाले आहे. अचानक पडणाऱ्या पावसाने पर्यटणावरही परीणाम झाला आहे. चिपळुणात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी (ता. १८) दुपारी १२ वाजता पावसाने हजेरी लावली. त्यानंतर दिवसभर पावसाचेच वातावरण होते.

शेतकरी बांधवांच्या शेतीचे व लग्न समारंभासाठी उभारलेले मंडपाचेही नुकसान झाले. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस होत असल्याने ग्राहक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेतील खरेदीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. दुपारी १२ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरवात झाली. अर्धा तासाहून अधिक पाऊस झाला. सायंकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. यावर्षी पावसाळ्यात ४५०० मि.मी.हून अधिक पाऊस तालुक्यात झाला आहे.

loading image
go to top