esakal | तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडपरिसरात मुसळधार पाऊस

तीन दिवस राज्यात मुसळधार पाऊस

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राज्यातील पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तविला आहे. उद्यापासून म्हणजेच चार सप्टेंबर ते सहा सप्टेंबर असे तीन दिवस राज्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. या कालावधीत काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाच्या क्षेत्र व त्याच्या आतल्या भागातील प्रवासाच्या शक्यतेमुळे जोरदार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. एकंदर संपूर्ण राज्यात याचा प्रभाव असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी शुक्रवारी (ता. ३) हलक्या पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरातमधील नालियापासून उदयपूर, गुना, गोंदिया, गोपालपूर या परिसरावरून पूर्वमध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. हरियानापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आज कोकणात बहुतांश ठिकाणी, तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. ३) तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला.

हेही वाचा: गणेशोत्सव, ईद, दिवाळीसाठी केंद्राची मार्गदर्शक सूचना

शुक्रवारी बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावती या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर शनिवारी बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5 सप्टेंबरसाठी हवामान विभागानं पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर 6 सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

loading image
go to top