मुंबई - महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सचिवपदी मंडळाच्या स्थापनेपासून आजवर गेल्या ४५ वर्षात, एकाही सेवानिवृत्तीपर्यंत पूर्णवेळ कायम असणाऱ्या पात्रताधारक व्यक्तीची कधी नेमणूकच केली गेली नसल्याची धक्कादायक माहिती ही मंडळाकडून मिळालेल्या अधिकारातील माहितीतून समोर आले आहे.
मंडळात मागील ४५ वर्षांच्या या काळात लाभलेल्या पाच सचिवांपैकी केवळ दोनच सचिव हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेले, मात्र ते देखील केवळ सहा-सहा वर्षांपुरतेच का होते हे एक गूढच असल्याचे दिसते.