

Rajya Sabha Race in Maharashtra: Bharatiya Janata Party Shortlists 5 Names as Delhi Takes Final Call
esakal
महाराष्ट्रातून येत्या एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या सात जागांसाठी राज्यसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १६ मार्चला मतदान होणार असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः भाजप पक्षात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली असून, पक्षातील खऱ्या निष्ठावंतांना संधी मिळावी, या मागणीसाठी पक्षातील एक गट सक्रिय झाला आहे.