

Child Crime
ESakal
मुंबई : महाराष्ट्रात बालकांविरोधी गुन्ह्यांचा आलेख चढता असून येथे दिवसाला सरासरी ६१ बालकांवर अत्याचार होतात. त्यातील २४ बालकांवर लैंगिक अत्याचार घडतात, असे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) जारी केलेल्या अहवालावरून स्पष्ट होते. २०२३ मध्ये नोंद झालेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण या अहवालात आहे. त्यानुसार २०२३ मध्ये राज्यात बालकांविरोधी अत्याचाराचे २२,३९० गुन्हे नोंद झाले. २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये १,६२८ गुन्हे वाढले. संपूर्ण देशाच्या (केंद्रशासित प्रदेश पकडून) तुलनेत महाराष्ट्रात सुमारे १३ टक्के गुन्हे नोंद झाले आहेत.