

esakal
Maharashtra ration card beneficiaries can learn about the Mera e-KYC app, Aadhaar face authentication and the online ration card e-KYC process
रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत (NFSA) अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी घरबसल्या सुविधा उपलब्ध असल्याची माहिती एका सूचनाफलकावर देण्यात आली आहे. या सुविधेमुळे लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानात प्रत्यक्ष न जाता मोबाईलच्या मदतीने ई-केवायसी करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.