
पुणे : राज्यात यंदा मे महिन्यात पावसाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सामान्यतः कोरडा आणि उष्ण असलेला हा महिना यंदा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व पूरसदृश परिस्थितीमुळे गाजला. संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल एक हजार टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाले होते. सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांपैकी एक पुणे असून, पुण्यामध्ये २५०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जी सामान्यपेक्षा ६५७ टक्के अधिक आहे.