esakal | राज्यात नवे रुग्ण 15 हजाराच्या आत; मृतांची संख्याही घटली
sakal

बोलून बातमी शोधा

corona report

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 60 लाख 31 हजार 395 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 5 हजार 565 (16.11 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात नवे रुग्ण 15 हजाराच्या आत; मृतांची संख्याही घटली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून समोर येणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येते. शुक्रवारी (ता.4) दिवसभरात राज्यात 14 हजार 152 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 58 लाख 5 हजार 565 झाली आहे. तसेच दिवसभरात 20 हजार 852 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 55 लाख 7 हजार 58 वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 94.86 % एवढे झाले आहे. (Maharashtra reports 14,152 new corona cases)

शुक्रवारी राज्यात 289 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. पालघरमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 34 मृत्यू नोंदवण्यात आले. तर मुंबई 24, कोल्हापूर 28, औरंगाबाद 23 मृत्यू झाले आहेत. मृत्युचा दर 1.68 % इतका आहे.

हेही वाचा: मराठा आरक्षण: राज्य सरकार पूनर्विलोकन याचिका दाखल करणार

शुक्रवारी नोंद झालेल्या 289 मृत्यूंपैकी 193 मृत्यू हे मागील 48 तासातील, तर 96 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर आठवड्यापूर्वी झालेल्या 386 मृत्यूंची नोंद कोविड पोर्टलवर शुक्रवारी करण्यात आली. मृतांचा एकूण आकडा 98 हजार 771 इतका आहे. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 96 हजार 894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 60 लाख 31 हजार 395 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 5 हजार 565 (16.11 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा: म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी ठाकरे सरकारची मोठी घोषणा

दरम्यान, शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अजूनही कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन १५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने म्युकरमायकोसिसचे उपचार देणाऱ्या रुग्णालयांसाठी उपचाराचे दर निश्चित केले आहेत. या दरांपेक्षा जास्त दर आकारल्यास रुग्णालयावर कारवाई होणार आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.