राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ! २४ तासांत आढळले २५१५ नवे रुग्ण

Maharashtra reports 2515 new corona cases 2449 recoveries  deaths in the last 24 hours
Maharashtra reports 2515 new corona cases 2449 recoveries deaths in the last 24 hours esakal

मुंबई : आज राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारच्या तुलनेत पुन्हा वाढ झाली असून आज राज्यात मागील चोविस तासांमध्ये तब्बल 2515 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर आज 2449 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

बीए 5 व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण

राज्यात आज बीए 5 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण परराज्यातील आहेत. यासोबतच राज्यात बीए 4 आणि बीए 5 रुग्णांची संख्या ही 160 वर पोहोचली आहे. त्यामध्ये पुण्यात 93 रुग्ण, मुंबईमध्ये 51 तर ठाणे 5, नागपूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी 4 आणि रायगडमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण 78,67,280 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.97 टक्के इतकं झालं आहे. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान मुंबईत अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 1871 वर पोहचली आहे. तर राज्यात 142 स्वाइन फ्लू (इन्फ्लुएंझा ए एच1एन1) प्रकरणे आणि 1 जानेवारी ते 21 जुलै दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये 7 मृत्यूची नोंद देखील झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com