
राज्यात आज 3,883 कोरोना बाधितांची नोंद; दोघांचा मृत्यू
मुंबई : राज्यात गेल्या 24 तासांत 3,883 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 2802 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. आज नोंद करण्यात आलेल्या एकूण रूग्णांपैकी सर्वाधिक रूग्ण हे मुंबईतील असून या ठिकाणी 2,054 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे येथील नागरिकांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Corona Update News)
राज्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्क्यांवर गेले असून, मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 22,828 इतक्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 13,613 इतके रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.
हेही वाचा: अग्निपथला वाढता विरोध; भाजपच्या 10 नेत्यांना Y सुरक्षा देण्याचा निर्णय
दुसरीकडे राज्यासह देशातदेखील नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असून गेल्या 24 तासांत 13 हजार 216 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 68,108 हजारांवर पोहोचली असून, रुग्ण बरे होण्याचे रेट 98.63 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Web Title: Maharashtra Reports 3883 Fresh Covid 19 Cases And Two Deaths Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..