Maharashtra Water Levels : राज्यात पाणीटंचाईच्या झळा वाढण्याची शक्यता, धरणांमध्ये ६७८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध; बाष्पीभवनात वाढ
Evaporation Increase : उन्हाच्या वाढलेल्या चटकेमुळे राज्यातील धरणांतील पाणी कमी होऊ लागले आहे. रब्बी हंगामात पाणी मागणी वाढल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे : पंधरा दिवसांपासून उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील धरणांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीपातळी वेगाने कमी होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्याने पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.